पुस्तक परिचय – सह्याचला आणि मी – एक प्रेमकहाणी
लेखक: माधव गाडगीळप्रकाशक: राजहंस प्रकाशन परवाच ‘सह्याचला आणि मी – एक प्रेमकहाणी’ हे माधव गाडगीळ यांचे पुस्तक हातात पडले; आणि मी ते आधाशासारखे वाचून काढले. एक निसर्गप्रेमी, पद्मभूषण, पर्यावरणवादी चळवळीतला एक आधारस्तंभ आणि भटनागर प्रशस्ती पुरस्कार मिळालेला एक विद्वान म्हणून मी त्यांना ओळखून होतोच. तशा आमच्या गाठीभेटीही झाल्या होत्या. माझ्या ‘अनर्थ’ पुस्तकासाठी त्यांनी ब्लर्बही दिला …